शिवसेनेतर्फे जळगावात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:58 IST2018-10-09T16:54:43+5:302018-10-09T16:58:15+5:30
जळगावात व परीक्षेच्या काळात भारनियमन सुरु केल्या बद्दल महानगर शिवसेनेतर्फे शहर अभियंता तडवी यांना कंदील भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेतर्फे जळगावात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट
ठळक मुद्देजळगावात सोमवारपासून अचानक भारनियमनउत्सव व परीक्षेच्या कालावधीत भारनियमन त्रासदायकशिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा
जळगाव : जळगावात व परीक्षेच्या काळात भारनियमन सुरु केल्या बद्दल महानगर शिवसेनेतर्फे शहर अभियंता तडवी यांना कंदील भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव शहरात सोमवारपासून अघोषित ९ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायड़े, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, चेतन शिरसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.