इच्छापूर येथे शिवसेनेचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:25+5:302021-09-17T04:22:25+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापूर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला. आमदारकी हे पद ...

इच्छापूर येथे शिवसेनेचा मेळावा
मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापूर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला.
आमदारकी हे पद मिरवण्यासाठी नसून ते जनतेच्या सेवेसाठी समर्पित असणारे पद आहे. एक लाख लाभार्थींना श्रमिक कार्ड हे शिवसेनेच्या वतीने मोफत काढून देणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
श्रमिक कार्डद्वारे नोंदणी केलेल्या व कोरोनाकाळात रोजगार बुडालेल्याना दोन लाख रुपयांचा विमा व इतर फायदे मिळणार असल्याने नागरिकांनी तत्काळ शिवसैनिकांशी संपर्क साधून ई-श्रमिक कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
गावातील ज्येष्ठ नागरिक यांचा गौरवदेखील आमदारांच्या हस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भौई, उपतालुका प्रमुख शिवाजीराव पाटील, सरपंच गणेश थेटे, दीपक पवार, नवनीत पाटील, सूर्यकांत पाटील, पंढरीनाथ पाटील, नरेंद्र गावंडे, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद सोनार, प्रमोद इंगळे, शेषराव कांडेलकर, किशोर पाटील, गुलाब घटे, पंकज पांडव, सतीश नागरे, प्रमोद कोळी, दीपक वाघ, राजू भोई, समाधान पाटील, राहुल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळावा यशस्वितेसाठी ईश्वर बेलदार, रामेश्वर बेलदार, मोहन बेलदार, रामेश्वर पाटील, दिनेश पाटील, कृष्णा भोलानकर, विशाल महाराज, प्रमोद येरूकार, दिनेश येरुकार, मंगेश लहामगे, रवींद्र धाडे, श्रीराम वानखेडे, सुनील बेलदार, सहदेव भोई, दिनेश भडांगे, गोपाळ सपकाळ, अमोल येरुकर, गजानन भडांगे यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक सरपंच गणेश थेटे यांनी केले. तालुकाप्रमुख छोटू भोई यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी, तर आभार चंद्रकांत धाडे यांनी मानले.