रावेरला शिवसेनेतर्फे नारायण राणेंच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:04+5:302021-08-25T04:22:04+5:30

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नारायण राणे ...

Shiv Sena protests against Raver Narayan Rane | रावेरला शिवसेनेतर्फे नारायण राणेंच्या निषेधार्थ निदर्शने

रावेरला शिवसेनेतर्फे नारायण राणेंच्या निषेधार्थ निदर्शने

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नारायण राणे यांच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुकाप्रमुख योगिराज पाटील, शहरप्रमुख नितीन महाजन, छोटू पाटील, तालुका संघटक अशोक शिंदे, शिवसेना युवा शहरप्रमुख राकेश घोरपडे, समाधान महाजन, पिंटू महाजन, आदी शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने करीत तहसील कार्यालयावर धडक दिली. नारायण राणे यांचा धिक्कार करून निषेध नोंदवत त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी व्यक्त करणारे निवेदन तहसीलदारांतर्फे अव्वल कारकून कौशल चौधरी तथा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

240821\img-20210824-wa0042.jpg

रावेर तहसील कार्यालयावर धडक देत शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निषेधार्थ अव्वल कारकून कुशल चौधरी, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना निवेदन देतांना शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालूका प्रमुख योगीराज पाटील,तालुका संघटक अशोक शिंदे, शहरप्रमुख नितीन महाजन, युवा शहर प्रमुख राकेश घोरपडे, समाधान महाजन, पिंटू महाजन आदी दिसत आहेत.

Web Title: Shiv Sena protests against Raver Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.