धरणगावात शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:43 IST2019-07-24T22:43:50+5:302019-07-24T22:43:56+5:30

शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Shiv Sena honors the quality students in the dam | धरणगावात शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

धरणगावात शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

धरणगाव, जि.जळगाव : शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. येथील सुकमल मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण झालेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक अनिल बाविस्कर यांनी केले. यावेळी हर्षल गुलाबराव वाघ याने सिव्हील इंजिनिअरिंगमधील उल्लेखनिय यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
तसेच तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या गुंजन चौधरी, दिव्या पाटील, प्रीती पाटील, रोहन शेख, अमित पटेल, हुजेबा देशपांडे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाळ पाटील, पं.स.सदस्य मुकुंदराव ननवरे, प्रेमराज पाटील, पं.स.सभापती सुरेखा पाटील, उपसभापती जनाबाई कोळी, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, दामू पाटील, मोती पाटील, दीपक सोनवणे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
 

Web Title: Shiv Sena honors the quality students in the dam