चाळीसगाव येथे भरधाव वाहनाच्या धडकेने अज्ञात वृद्ध महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:53 IST2019-08-20T21:06:21+5:302019-08-20T21:53:45+5:30
रस्त्याने पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धेला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.

चाळीसगाव येथे भरधाव वाहनाच्या धडकेने अज्ञात वृद्ध महिला ठार
चाळीसगाव, जि.जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धेला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, महिलेच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटणे अवघड झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती अशी की, १९ रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-भडगाव रोडवर टाकळी प्र.चा. गावाजवळ ६० वर्षीय अनोळखी महिना रस्त्याच्या कडेने पायी जात होती. तेव्हा समोरून भरधाव वेगाने येणाºया अज्ञात चारचाकी वाहनाने या वृद्धेला जोरदार धडक दिली. त्यात वाहनाचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने महिलेची ओळख पटून आली नाही. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक गोपाल भोई करीत आहेत.