शिरसोली रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST2021-04-06T04:15:18+5:302021-04-06T04:15:18+5:30

बाजारपेठेत वाहतूक कोंडी जळगाव : सोमवारी सायंकाळी बाजार पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे चौबे मार्केट परिसरात वाहतुकीची ...

Shirsoli railway gate will be closed for two days | शिरसोली रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार

शिरसोली रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार

बाजारपेठेत वाहतूक कोंडी

जळगाव : सोमवारी सायंकाळी बाजार पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे चौबे मार्केट परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांनी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. तरी वाहतूक विभागाने नियमित वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

बंद मार्ग सुरू करण्याची मागणी

जळगाव : मेहरुण तलाव परिसरातील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर ते रामेश्वर काॅलनीकडे येणारा रस्ता मोटारसायकल जाण्यापुरता तरी सुरू करावा, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय टळेल, अशी मागणी या भागातील रहिवासी अनु कोळी यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जळगाव : शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्या असून, या विक्रेत्यांकडून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात

जळगाव : नवीपेठेत अनेक ठिकाणी अनियमित साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबल्या आहेत. यामुळे ऐन कोरोना काळात साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Shirsoli railway gate will be closed for two days