शिरसोली-कुऱ्हाडदा रस्त्याची दीडच वर्षा ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:00+5:302021-08-25T04:22:00+5:30
शिरसोली : शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान दीडवर्षांपूर्वीत झालेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून ...

शिरसोली-कुऱ्हाडदा रस्त्याची दीडच वर्षा ‘वाट’
शिरसोली : शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान दीडवर्षांपूर्वीत झालेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून रसत्यावरील हे खड्डे बुजवून ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शिरसोली ते कुऱ्हाडदा हे पाच कि.मी. चे अंतर पार करण्यासाठी म्हसावदहून पंधरा कि. मी. फेऱ्याने जावावे लागत असे. हे अंतर कमी होवून ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिरसोली ते कुऱ्हाडदा या पाच कि.मी. रस्त्याचे दीडवर्षापूर्वी ८५ लाख रुपये खर्च करुन डांबरीकरण करण्यात आले. कामाला दीडच वर्ष होत नाही तोच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्याने शेतकरी व ग्रामस्थाना वापरणे कठीण झाले असून खड्डे बुजवून झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिरसोली येथील शेतकरी बबन हिवराळे यांनी केली आहे.
---------------------
फोटो कॅप्शन - रस्त्यावर असे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.