शिंदाडची कन्या नक्षलवादी भागात करते देश सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:14 IST2019-03-08T00:14:24+5:302019-03-08T00:14:46+5:30
महिला म्हणून सेवारत असल्याचा अभिमान

शिंदाडची कन्या नक्षलवादी भागात करते देश सेवा
संदीप सराफ
शिंदाड, ता.पाचोरा : महाराष्टÑ, छत्तीसगड व आंध्र प्रदेशच्या सीमेवरील गडचिरोली हे महाराष्ट्र राज्यातील नक्षलवादी भाग असलेल्या क्षेत्रात शिंदाड, ता.पाचोरा येथील कन्या गीता भागचंद परदेशी ही पोलीस दलात सेवा करीत आहे. एक महिला म्हणून सेवारत असल्याचा अभिमान असल्याचे त्या सांगतात.
गीता ही सण २०१० मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाली व तिची नेमणूक गडचिरोली येथे झाली. खरं तर खेड्यातली मुलगी गाव सोडून काही माहिती नाही. आई-वडील अशिक्षित तरीदेखील न डगमगता स्वत:च्या हिमतीवर गीताने पदभार स्वीकारला.
पोलीस कॉन्स्टेबल गीता परदेशी आता गडचिरोली पोलीस स्टेशनला मोटार परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत आह.े उत्कृष्ट कार्याबद्दल तिला सण २०१७ साली ‘खडतर सेवा’ हा पुरस्कारदेखील देण्यात आला आहे.
गीताचे वडील भागचंद परदेशी, आई मंगलबाई हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र त्यांनी गीताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला मदत केली. विवाहानंतर तिचे सासरी किरकोळ वाद झाले तरी न डगमगता तिने मेहनत करून पोलीस भरती केली व ती यशस्वी झाली. आता ती पती, एक मुलगा व मुलगी यांच्यासह गडचिरोली येथे राहते.
आपबीती- गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी भाग आहे. येथे नोकरी करीत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यातच माझी वाहन चालक म्हणून जबाबदारी असून, हे काम खूपच जिकिरीचे आहे. येथील धानोरा तालुक्यातील कारवा पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर दिले. त्यावेळेस मात्र आम्ही मोठ्या मोहिमेला सामोरे गेलो होतो, असे तिने सांगितले.