चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी शरद पवारांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:40 IST2019-11-23T18:39:55+5:302019-11-23T18:40:01+5:30
माजी आमदार राजीव देशमुख यांची माहिती

चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी शरद पवारांसोबत
चाळीसगाव, जि.जळगाव : माझ्यासह संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंड केले तरी त्याचा कुठलाही परिणाम पक्षावर होणार नाही. संबंध महाराष्ट्र आज शरद पवार यांच्यासोबतच राहील, अशी माहिती माजी आमदार राजीव देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन जो राजकीय भूकंप झाला आहे. त्याबाबत माजी आमदार देशमुख म्हणाले की, राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा झाल्यानंतर त्याचा अहवाल केंद्रात जाईल व त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा वटहुकूम रद्द होईल. त्यानंतर शपथ विधीचा होईल. ही प्रक्रिया असताना रातोरात आणि अचानक राजभवनात शपथविधीचा कार्यक्रम झाला. केवळ सत्तेचा दुरुपयोग केला गेला. ही बाब लोकशाहीचा काळीमा फासणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.