जळगावात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक बिबटयाला ठार करण्यात अखेर यश, सात जणांचा घेतला होता बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 23:07 IST2017-12-09T22:59:31+5:302017-12-09T23:07:44+5:30
जळगाव जिल्ह्यात सर्वसामान्यांना भयभयीत करुन सोडणा-या नरभक्षक बिबटयाला ठार करण्यात अखेर यश मिळाले आहे.

जळगावात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक बिबटयाला ठार करण्यात अखेर यश, सात जणांचा घेतला होता बळी
जळगाव - जळगाव जिल्ह्यात सर्वसामान्यांना भयभयीत करुन सोडणा-या नरभक्षक बिबटयाला ठार करण्यात अखेर यश मिळाले आहे. चाळीसगाव लहान वरखेडे भागात या बिबटयाला ठार करण्यात आले. या बिबटयाने आतापर्यंत सात जणांचा बळी घेतला होता. वनविभागाने ही कारवाई केली. हैदराबादा येथील शार्पशूटर नवाब खान यांनी बिबटयाला शुट केले. तहसिलदार देवरे यांनी याची पुष्टी केली आहे. रात्री 10.20 च्या सुमारास बिबटयाला शूट करण्यात आले.
चाळीसगाव परिसरात गेल्या 8 जुलैपासून बिबट्याचे हल्ले होत होते. त्यात आतापर्यंत 4 महिला, 3 बालक आणि 12 जनावरे बळी गेले आहेत. चाळीसगाव परिसरातील वरखेडे, उंबरखेड व देशमुखवाडी परिसरात हा उपद्रव सुरू होता.