जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:53 IST2020-05-26T18:52:34+5:302020-05-26T18:53:02+5:30

जळगाव - जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह ...

Seven more corona-infected patients were found in the district | जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव- जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव येथील एक याप्रमाणे एकूण सात व्यक्तींचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 482 इतकी झाली आहे.

 

Web Title: Seven more corona-infected patients were found in the district