सेवा हाच परमधर्म...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 13:04 IST2019-08-29T13:03:47+5:302019-08-29T13:04:21+5:30
तीर्थंकर भगवान महावीर ने बारा प्रकारचे तप सांगितले आहेत. उपवास, रसत्याग, इंद्रीय संयम अशा प्रकारच्या तपापेक्षाही ध्यान, स्वाध्याय याला ...

सेवा हाच परमधर्म...
तीर्थंकर भगवान महावीर ने बारा प्रकारचे तप सांगितले आहेत. उपवास, रसत्याग, इंद्रीय संयम अशा प्रकारच्या तपापेक्षाही ध्यान, स्वाध्याय याला श्रेष्ठ म्हटले आहे. भगवान म्हणतात की जो मुनी बेशुध्द, रुग्ण, वृध्द, तपस्वी यांची सेवा सहजभावाने करेल, तो माझी सेवा करतोय, असे मानले जाईल. सेवा करणाऱ्याला दोन गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे. सेवा करण्याची भावना असेल तर अहंकारमुक्त सेवा द्यावी लागेल. सेवा करताना मोठी छोटी असा भेद करून चालणार नाही. तुमच्यासमोर जो अपेक्षा घेऊन उभा आहे, त्याला काय हवंय, कसं हवंय हे पाहून त्याला जर आपण काही देऊ शकत असाल तर द्यावे. पण प्रतिदानाची भावना न ठेवता दान करावे. सेवा करताना लहान मोठा, गरीब श्रीमंत, काळा गोरा असा भेद करून चालत नाही. महात्मा गांधी स्वत: रोग्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असत.
सेवेची सीमा केवळ शरिरापुरतीच मर्यादीत नाही. शारीरिक सेवेपेक्षाही मोठी आहे ती मानसिक सेवा. समोरचा कोणत्याही जटील प्रकृतीचा असू दे, सेवा करणाºयाने त्याला आपल्या सेवेसाठी अनुकुल बनवले पाहिजे. घृणा, व्देष विरहीत समतेचा भाव मनात ठेवून सेवा करणारा हाच खरा सेवक आहे. सेवा करण्यामुहे आपल्या स्वत:चे रसायनही बदलून जातात. सेवा ही नवी ऊर्जा आणि नवा प्रकाश देते. म्हणूनच म्हणतात सेवाधर्म हा खूप खोल आहे आणि योगींसाठी तो तर अगम्य आहे, असे म्हणावे लागेल.
-साध्वी डॉ. योगक्षेमप्रभाजी