Serpents at Paladhi gave life to the dragon | पाळधी येथील सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान
पाळधी येथील सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरजसर्पास न मारता, सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवा

पाळधी, ता.जामनेर : येथे १० फूट लांबीच्या अजगरास पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे.
रब्बी हंगाम सुरू झाला असून, गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेल्या गारव्यामुळे अनेक विषारी सर्प पाण्याच्या ठिकाणी वास करत असून, यामुळे शेतकºयांना रात्री अंधारात सर्पदंश होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितित शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोमवारी पहूर परिसरातील शेतकरी फकिरा नथ्थू घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवण्याच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकिरा घोंगडे यांना घडले. या अजगराचे अगडबंब रूप पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमित्राला बोलविले. त्यानंतर सर्पमित्र नाना माळी यांनी १० फूट लांबीच्या अजगरला पकडले. नाना माळी यांचे धाडस पाहून शेतकºयांनी त्यांंचे आभार मानत कौतुक केले.
सर्पमित्राने अजगरास जामनेर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांच्या ताब्यात दिले. अजगराला सुरक्षित अधिवासात सोडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एल.राणे व डॉ.एस.एस.व्यवहारे यांनी प्रथमोपचार केले. परिसरामध्ये साप आढळल्यास त्याच्यावर हल्ला न चढविता, त्याला न मारता सर्पमित्राच्या माध्यमातून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था केल्यास अन्नसाखळी अबाधित राहते, असे वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी सांगितले.
काही जातीचे साप विषारी, काही निमविषारी, तर काही बिनविषारी जातीचे असतात. सर्पमित्र साप पकडतात म्हणून कोणीही साप पकडण्याचे धाडस करू नये. कारण अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या पद्धतीने सापडल्यामुळे दंश झाल्यास जीवावरसुद्धा बेतू शकते. त्यामुळे युवकांनी विश्वासू सर्पमित्रांशीच किंवा माझ्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले.
पाळधीसह परिसरात कोठेही मानवी वसाहतीत साप निघाल्यास मला माहिती देतात. आजपर्यंत कुणाकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जवळपास ७०० सापास पकडून वनअधिवासात सोडून दिले आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होत आहे. -नाना माळी, सर्पमित्र, पाळधी

Web Title: Serpents at Paladhi gave life to the dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.