यावल तालुक्यातील नायगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 18:21 IST2017-12-25T18:17:30+5:302017-12-25T18:21:21+5:30

नायगाव येथील रहिवासी नागो भावराव पाटील (वय ५५) यांच्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

A seriously injured in bear's attack in Naigaon Shivar in Yaval taluka | यावल तालुक्यातील नायगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

यावल तालुक्यातील नायगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

ठळक मुद्देदोन दिवसातील अस्वलाचा दुसरा हल्लाशेतात पाणी भरत असताना झाला हल्लाजखमी पाटील यांना उपचारासाठी जळगावात हलविले

आॅनलाईन लोकमत
यावल, दि.२५ - तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी नागो भावराव पाटील (वय ५५) यांच्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पाटील हे शेतात पिकास पाणी भरत असताना हा हल्ला झालो.
यावल तालुक्यातील नायगाव येथील नागो भावराव पाटील यांचे निबादेवी- नायगाव रस्त्यावर सौखेडा शिवारात शेत आहे. रविवारी पाटील शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी पाटील यांना जळगावला उपचारार्थ नेले आहे. या घटनेमुळे परीसरातील शेतकºयामध्ये प्रचंड घबराहट पसरली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शेतकºयावर अस्वलाने हल्ला केला होता. दोन दिवसातील हा दुसरा हल्ला आहे.
 

Web Title: A seriously injured in bear's attack in Naigaon Shivar in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.