पहूर येथील जेष्ठ नागरिकाने पोलीसांची बाजू घेतल्यावरून युवकाकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:06 IST2020-06-13T21:06:10+5:302020-06-13T21:06:49+5:30

पाण्यात मांडला ठिय्या : युवक पोलीसांच्या ताब्यात

A senior citizen of Pahur was beaten by a youth for taking the side of the police | पहूर येथील जेष्ठ नागरिकाने पोलीसांची बाजू घेतल्यावरून युवकाकडून मारहाण

पहूर येथील जेष्ठ नागरिकाने पोलीसांची बाजू घेतल्यावरून युवकाकडून मारहाण

 






पहूर ता जामनेर: पोलिसांनी मास्क बांधले नाही म्हणून दोन युवक पोलिसांना अरवाच्च भाषा वापरत असताना जेष्ठ नागरिकाने युवकांना स्वत: तोंडाला मास बांधा असे सांगितल्याचा राग आल्याने एका युवकाने बसस्थानक परीसरात जेष्ठ नागरीकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पहूर पोलीसांनी कारवाई करून दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवार ते रविवार पहूर येथे बंद पाळण्यात येत आहे. पोलीस गस्तीवर जात असताना अनिकेत कडुबा चौथे व त्याचा साथीदार पोलिसांना मास्क बांधण्याबाबत अप्रत्यक्ष बोलत होते. यादरम्यान जेष्ठ नागरिक रंगनाथ भामेरे महाराजांनी पोलिसांची बाजू घेऊन तुमच्या तोंडाला अधी मास्क मास बांधा असे युवकांना हटकले. याचा राग आल्याने अनिकेत चौथे याने महाराजाला बेदम मारहाण केली. यादरम्यान पोलीस व महाराज यांच्यात समन्वय न झाल्याने महारांजाच्या घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने महाराजांनी बसस्थानकात परीसरात अधार्तास ठिय्या दिला. याची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी तात्काळ हजर झाले. अनिकेत चौथे व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.पैकी अनिकेत विरुद्ध १५१ प्रमाणे कारवाई केली आहे. महारांजाची समजूत काढून वादावर पडदा टाकला आहे.

 

Web Title: A senior citizen of Pahur was beaten by a youth for taking the side of the police