स्वयंमूल्यमापनात मिळाले ३५ गुण
By Admin | Updated: July 24, 2015 20:08 IST2015-07-24T20:08:17+5:302015-07-24T20:08:18+5:30
केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. विविध १५ निकषांच्या अनुषंगाने स्वयंमूल्यमापनात मनपाला १00 पैकी ३५ गुण प्राप्त झाले आहेत.

स्वयंमूल्यमापनात मिळाले ३५ गुण
जळगाव : केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी मनपाने स्वयंमूल्यमापन करून अहवाल २२ जुलैपर्यंत सादर करावयाचा होता. शासनाने फटकारल्यानंतर मनपाने हा अहवाल गुरुवारी दुपारी शासनाला पाठविला. विशेष म्हणजे विविध १५ निकषांच्या अनुषंगाने 'स्वयंमूल्यमापनात' मनपाला १00 पैकी अवघे ३५ गुण प्राप्त झाले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मनपाने स्वयंमूल्यमापन करून या योजनेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार विविध विभागांकडून माहिती मागवून हा अहवाल तयार करण्यात आला. त्यात मनपाला १00 पैकी ३५ गुण आहेत. महसुली उत्पन्न गत तीन वर्षांपासून वाढते असले पाहिजे, या निकषात शून्य गुण आहेत. याखेरीज गत जनगणनेच्या तुलनेत झालेली लोकसंख्येत वाढ, गत २ वर्षांपासूनचे अर्थसंकल्प वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले असणे, क्षेत्रसभांचे आयोजन आदी विविध मुद्यांचा समावेश आहे.
स्वयंमूल्यमापनासाठी पाणीपुरवठा योजनेवरील खर्च व त्यातुलनेत पाणीपट्टीचे उत्पन्न हादेखील निकष आहे. त्यात पाणी योजनेवरील खर्चाच्या रकमेपैकी किमान ८0 टक्के रक्कम ही पाणीपट्टीतून वसूल झाली पाहिजे, असे अपेक्षित आहे. त्यात मनपाला सर्वात जास्त १0 गुण मिळाले आहेत.