सौरभ जैन यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:05+5:302021-09-10T04:24:05+5:30

मध्य रेल्वेवर किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या जळगाव : गेल्या वर्षी देवळाली ते दानापूर दरम्यान किसान रेल्वे सुरू झाली असून, ...

Selection of Saurabh Jain | सौरभ जैन यांची निवड

सौरभ जैन यांची निवड

मध्य रेल्वेवर किसान रेल्वेच्या ५६७ फेऱ्या

जळगाव : गेल्या वर्षी देवळाली ते दानापूर दरम्यान किसान रेल्वे सुरू झाली असून, ही गाडी सध्या मुजफ्फरपुरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ७ ऑगस्ट पासून पहिली किसान रेल्वे सुरू होऊन, ६ सप्टेंबर पर्यंत किसान रेल्वेने ५६७ फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या गाडीने रावेर, सावदा या भागातून दिल्लीपर्यंत ६ फेऱ्या चालविल्या असल्याचे भुसावळ विभागाने कळविले आहे.

टॉवर चौकात वाहतुक कोंडी

जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्यामुळे, नेहरू चौकापासून ते टॉवर चौकापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

Web Title: Selection of Saurabh Jain