निखिल सूर्यवंशी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST2021-07-26T04:16:05+5:302021-07-26T04:16:05+5:30

रस्त्याची दुरावस्था जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून यात पाणी ...

Selection of Nikhil Suryavanshi | निखिल सूर्यवंशी यांची निवड

निखिल सूर्यवंशी यांची निवड

रस्त्याची दुरावस्था

जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून यात पाणी साचून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार हा रस्ता दुरुस्त होतो व खराब होतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पावसाळ्यात नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे.

कोब्राने दंश केलेल्या सर्पमित्राला जीवदान

जळगाव : भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील शशिकांत गोटू पाटील या सर्पमित्राला कोब्राने दंश केल्यानंतर जळगावातील रुग्णालयात उपचार करून जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जुवार्डी परिसरात साप निघाला म्हणून नागरिकांनी शशिकांत यांना फोन करून साप पकडण्यासाठी बोलावले होते. घटनास्थळी हा कोब्रा असल्याचे लक्षात आल्यानंतर तो पकडून बरणीमध्ये ठेवत असतांना कोब्रा सापाने शशिकांत पाटील यांना दंश केला. त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, भडगावमधील रुग्णालयातही त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना जळगावातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ. नीलेश किनगे यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाटील यांच्यावर यशस्वी उपचार केले.

Web Title: Selection of Nikhil Suryavanshi