भडगाव, जि.जळगाव : येथील पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ म्हणून जागृती मित्र मंडळाचे सचिव प्रा.दीपक मराठे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.येथील पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जात आहे. दरवर्षी अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा जागृती मित्र मंडळाचे सचिव प्रा.दीपक मराठे यांची निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचा पालिकेत नगरध्यक्ष अतुल पाटील, मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सत्कार केला. यावेळी नगरअभियंता रणजीत पाटील, लिपीक नितीन पाटील, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता गणेश लाड, भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जगन भोई, संतोष महाजन, आरोग्य निरीक्षक छोटू वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.दीपक मराठे यांनी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत आपले प्रयत्न राहणार असून, नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
भडगाव पालिकेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून दीपक मराठे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:52 IST
भडगाव पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ म्हणून जागृती मित्र मंडळाचे सचिव प्रा.दीपक मराठे यांची निवड करण्यात आली आहे.
भडगाव पालिकेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून दीपक मराठे यांची निवड
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविणारभडगाव पालिकेतर्फे समारंभ