शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST2021-02-16T04:18:08+5:302021-02-16T04:18:08+5:30

मानव सेवा विद्यालयात शहिदांना श्रद्धांजली जळगाव : येथील मानव सेवा विद्यालयात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

Seeking permission to celebrate Shiva Jayanti | शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळण्याची मागणी

शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळण्याची मागणी

मानव सेवा विद्यालयात शहिदांना श्रद्धांजली

जळगाव : येथील मानव सेवा विद्यालयात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील, गिरीश जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

रायसोनी विद्यालयात विद्यार्थांचा गौरव

जळगाव : येथील भाऊसाहेब यू. एन. रायसोनी यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रेमनगर येथील रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ऑनलाइन क्लासमध्ये नियमित हजर असणाऱ्या विद्यार्थांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्यासह विद्यार्थांचे पालक उपस्थित होते.

रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

जळगाव : शहरातील जुन्या बस स्टॅण्डसमोर खाद्य पदार्थ व्यावसायिकांच्या हातगाड्या व प्रवासी वाहने उभी राहत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

रेल्वे-बस गाड्यांना गर्दी

जळगाव : सध्या लग्नसराई जोराने सुरू असल्यामुळे, सोमवारी रेल्वे गाड्या व बसेसला मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी दिसून आली. पॅसेंजर बंद असल्यामुळे नागरिक बसेसला प्राधान्य देत असून, धुळे, नाशिक, औरंगाबाद मार्गावरील बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लांब पल्ल्यावरील रेल्वे गाड्यानांही आरक्षण मिळत नसल्यामुळे, प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Seeking permission to celebrate Shiva Jayanti