शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना शोधत मुलगा पाळधीत पोहचला अन‌् त्यांच्या आत्महत्येचा निरोप आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

दरम्यान, यादव यांना दम्याचा आजार होता. चहार्डी, ता.चोपडा येथे दर्ग्यावर बाबांकडे जाऊन येतो असे सांगून ते सोमवारी सकाळीच घरातून ...

दरम्यान, यादव यांना दम्याचा आजार होता. चहार्डी, ता.चोपडा येथे दर्ग्यावर बाबांकडे जाऊन येतो असे सांगून ते सोमवारी सकाळीच घरातून बाहेर पडले. बुधवारी सकाळी सेवानिवृत्त पोलीस हवालदार लालसिंग उदयसिंग पाटील यांच्या पिंप्राळा शिवारातील गट क्र.३२० मधील शेतातील विहिरीत यादव यांचा मृतदेह पाटील यांनाच तरंगताना दिसून आला. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. हवालदार अनमोल पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडिलांना शोधत मुलगा पोहोचला पाळधीत

चहार्डी येथे गेलेले वडील संध्याकाळपर्यंत घरी परतणे अपेक्षित होते, मात्र ते आले नाहीत. कुठे तरी मुक्कामाला थांबले असावे म्हणून मुलाने त्या दिवशी चौकशी केली नाही. दुसऱ्या दिवशीही वडील घरी न आल्याने त्यांनी चहार्डीत चौकशी केली असता ते सोमवारीच परत गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुलगा संजय यादव याने मंगळवारपासून वडिलांचा शोध घेतला. बुधवारी तो त्यांना शोधण्यासाठी पाळधीपर्यंत पोहचला अन‌् लगेच वडिलांचा मृतदेह विहिरीत आढळल्याचा निरोप आला. आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलगा संजय याने ‘लोकमत’ला सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई, अविवाहित मुलगा संजय व विवाहित मुलगी अरुणा संजय पाटील असा परिवार आहे. यादव कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात.