भडगाव तालुक्यातील ६३ गावांमध्ये टंचाईच्या झळा : १५ गावांमध्ये उपाययोजना, ‘ब्रेक के बाद’ गिरणेच्या आवर्तनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:47 IST2018-05-19T23:34:51+5:302018-05-19T23:47:30+5:30
दुष्काळात पाणीटंचाईचा तेरावा महिना

भडगाव तालुक्यातील ६३ गावांमध्ये टंचाईच्या झळा : १५ गावांमध्ये उपाययोजना, ‘ब्रेक के बाद’ गिरणेच्या आवर्तनाची प्रतीक्षा
आॅनलाईन लोकमत
भडगाव, जि.जळगाव, दि. १९ : भडगाव तालुका शासनाने दुष्काळी जाहीर केला आहे. दुष्काळी अन् तापमानाच्या फटक्याने जलपातळीही खोल गेली. तालुक्यात नागतिकांसह जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करीत आहे. तालुक्यात ६३ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाने १५ गावांमध्ये पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
वडगाव येथे टँकरचा प्रस्ताव
तालुक्यात आंचळगाव व भोरटेक या दोन गावांसाठी दोन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. वडगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनास देण्यात आला आहे ‘मे हिट’च्या तापमानात पाणीटंचाई जाणवत असून, पुन्हा ‘ब्रेक के बाद’ गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन प्रशासनाने तत्काळ सोडण्याची मागणी होत आहे.
३५ गावांचा संभाव्य कृती आराखडा
तालुका संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात सन २०१७ व २०१८ या वर्षासाठी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग पाचोऱ्याने ६३ गावांपैकी ३५ गावांचा समावेश केलेला आहे. यात पहिल्या टप्प्यात पाच गावांचा समावेश केलेला आहे. यात आॅक्टोबर ते डिसेंंबर २०१७ या दरम्यान महिंदळे, तळबण तांडा, मळगाव, तांदुळवाडी, निंभोरा अंतर्गत नगरदेवळा स्टेशन वस्ती आदी गावांचा संभाव्य पाणीटंचाइत समावेश आहे.
दुसरा टप्प्यात जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण १५ गावांचा पाणीटंचाईत समावेश केलेला आहे. यात आंचळगाव, धोत्रे, वसंतवाडी, अंजनविहीरे, बांबरुड प्र. उ., बोदर्डे, बात्सर , भटगाव, भातखंडे बुद्रूक, गुढे, कनाशी, कोळगाव, कोठली, लोणपिराचे, वरखेड आदी १५ गावांचा समावेश करण्यात आहे.
तिसºया टप्प्यात एप्रिल २०१८ ते जून २०१८ या दरम्यान संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात एकूण १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात वडगाव, नालबंदी, वडजी, वलवाडी बुद्रूक, खेडगाव खुर्द, सावदे, पांढरद, पासर्डी, पळासखेडे, मांडकी, शिवणी, शिंदी, पेंडगाव, आडळसे, बांबरुड प्र.ब. या १५ गावांचा समावेश आहे. या १५ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ एकूण १९ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बडे यांनी दिली.