शिरसोलीत सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:58+5:302021-07-15T04:12:58+5:30

शिरसोली, ता. जळगाव : शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवारी सरपंच हिलाल ...

The school will start in Shirsoli | शिरसोलीत सुरू होणार शाळा

शिरसोलीत सुरू होणार शाळा

शिरसोली, ता. जळगाव : शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवारी सरपंच हिलाल भिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही परवानगी देण्यात आली. त्यानुसार गावातील तीन शाळांनी मागणी केल्यानुसार ग्रा.पं.ने ठराव केल्याने शाळा सुरू करण्यात येणार आहे.

शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालय, पद्मालया इंग्लिश मीडियम स्कूल, जि.प. उर्दू शाळा यांनी शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्याबाबत ग्रा.पं.कडे पत्र दिले होते. या पत्राचे वाचन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. यावेळी सरपंच हिलाल भिल, उपसरपंच श्रावण ताडे, ग्रामसेवक सुनील दांडगे, तलाठी भरत नन्नवरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले, शशिकांत अस्वार, विनोद बारी, गोकुळ ताडे, मुद्दसर पिंजारी, गौतम खैरे, भगवान बोबडे, मिठाराम पाटील, केंद्रप्रमुख वांद्रे यांच्यासह तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.

Web Title: The school will start in Shirsoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.