शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

मानवसेवा विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST

मानवसेवा विद्यालयात हिंदी सप्ताह राबविण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाचवीसाठी ...

मानवसेवा विद्यालयात हिंदी सप्ताह राबविण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाचवीसाठी शुद्धलेखन, सहावीसाठी कविता गायन तर इयत्ता सातवीसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. ‘हिंदी हमारी राष्ट्रभाषा’ या विषयावर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत नंदन मोरे यांने प्रथम तर चंचल पाटीलने द्वितीय क्रमांक पटकाविला. याप्रसंगी अलका महाजन यांची उपस्थिती होती.

००००००००

प्रगती विद्यामंदिर शाळेत 'बहुरंगी कौशल्य' उपक्रम (१५ सीटीआर ४२)

प्रगती विद्यामंदिरात 'बहुरंगी कौशल्य' उपक्रम घेण्यात आला़ या उपक्रमातंर्गत ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोषवाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धा पार पडल्या. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल व शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक संध्या अट्रावलकर, संगीता गोहिल, नम्रता पवार, अविदीप पवार, सारिका तडवी, रमेश ससाणे आदी उपस्थित होते.

००००००००

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सुरुवातीला किर्ती नाईक यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम सोहम बिऱ्हाडे, द्वितीय दिव्या काटोले, तृतीय जिज्ञासा पाटील, उत्तेजनार्थ ओमकार राख ठरला तसेच आठवी ते दहावीच्या गटात प्रथम हर्षल सपकाळे, द्वितीय आयूष पाटील, तृतीय वेदांत हिवराळे तर उत्तेजनार्थ अनुष्का महाजन ही ठरली.

००००००००

पोदार इंटरनॅशनल स्कूल

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्याहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मनस्वी बडगुजर, लोकेश ठाकरे, संतोषी मंडोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त प्राचार्य रमेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य दीपक भावसार,पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, हिरालाल गोराणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक बेडसे यांनी केले. आभार प्रदर्शन रंजना गवळी यांनी केले.