वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा संदेश समाजापर्यंत पोहचविण्यासाठी वृक्षांना बांधल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 15:20 IST2018-08-25T15:20:11+5:302018-08-25T15:20:31+5:30
चोपडा येथे चिमुकल्यांनी घालून दिला आदर्श

वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा संदेश समाजापर्यंत पोहचविण्यासाठी वृक्षांना बांधल्या राख्या
चोपडा, जि.जळगाव : येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, आर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या मुलांनी वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा हा संदेश देण्यासाठी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
झाडांचे संरक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. झाडे लावा, झाडे वाचवा व पर्यावरणाचा समतोल जपण्याचा संदेश या कार्यातून देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख डॉ.राहुल पाटील, डॉ.तृप्ती पाटील आणि शिक्षिका उपस्थित होत्या.