सातपुड्यात चार दिवसांपासून वनवा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:24 IST2019-03-17T23:23:08+5:302019-03-17T23:24:45+5:30
अनमोल वनसंपदा जळून खाक

सातपुड्यात चार दिवसांपासून वनवा कायम
बिडगाव, ता.चोपडा : परिसरातील सातपुडा पर्वतास लागलेली वनव्याची धग थांबत नसून चार दिवसांपासून लागलेली आग कायम आहे. यामुळे वनातील अनमोल वनसंपदा जळून खाक होत आहे. असे असले तरी अधिकारी मात्र सुस्त असल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे.
चोपडा तालुक्याच्या देवझीरी अडावद हद्दीत दररोज वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनवा लागून आगीत लाखो रूपयांची अनमोल वन, वृक्ष व खणीज संपत्तीची राख रांगोळी होत आहे. गेल्या चार दिवसांपासून लागलेली आग सुरूच असून १७ रोजी रात्रीही मोठ्या प्रमाणावर वनवा लागल्याचे दिसून आले. वनवा तब्बल १५ ते २० कि.मी.वरून सहज दिसत आहे.