खडके खुर्द येथे सुनेकडून सासु पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:27 IST2021-01-18T13:26:45+5:302021-01-18T13:27:28+5:30
खडके खूर्द ग्रामपंचायतीत सुनबाईंनी आपल्या सासूबाईंचाच पराभव केला.

खडके खुर्द येथे सुनेकडून सासु पराभूत
ठळक मुद्देयुवा सेना तालुकाप्रमुखांना पराभवाचा धक्का, पत्नी विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील (२०४) या सुनबाईनी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तर त्यांच्या धर्मपत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.
खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये १४९ नोटा आहे. तसेच शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या आहेत तर तर युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील यांच्या पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले