चाळीसगावच्या तिघांची हिमालयात यशस्वी 'सारपास' ट्रेकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:00 IST2018-07-17T12:32:17+5:302018-07-18T00:00:02+5:30

'Sarpas' peak in the Himalayas | चाळीसगावच्या तिघांची हिमालयात यशस्वी 'सारपास' ट्रेकिंग

चाळीसगावच्या तिघांची हिमालयात यशस्वी 'सारपास' ट्रेकिंग

ठळक मुद्देमोहीम फत्ते१३,५०० फूट उंचावरील चढाई यशस्वी

चाळीसगाव, जि. जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश देशमुख, व्यावसायिक नीलेश शर्मा, दीपेश जैन या तिघा तरुणांनी नुकतीच हिमालयातील 'सारपास' ट्रेक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ४ ते १२ जून दरम्यानच्या या मोहिमेत ते ३३ गिर्यारोहकांच्या चमूत सहभागी झाले होते.
जून महिन्यात हिमालयात २५०० मीटर उंचीच्या शिखरापासून १३,५०० पेक्षा अधिक मीटर उंच सारपासपर्यंत मोहिमेत गिर्यारोहकांचा सहभाग असतो.
प्रतिकुल हवामान
विरळ हवा, प्रखर सौर किरणे,तीव्र वारा आणि दररोज बदलणार तापमान अशा परिस्थितीत जून महिन्यात या ‘सारपास चमूने’ ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली.
देवभूमी हिमायलाच्या पार्वती खोऱ्यात कासोलपासून हा ट्रेक सुरू होतो. त्यात दररोज १२ ते १७ किमी. चढाई करणे अग्नीदिव्य ठरते. शून्यअंश तापमान, हाडे गोठवून टाकणारी थंडी, वेगाने वाहणारे वारे आणि लवकर न संपणारा पायी प्रवास. अशी संकटांची वाट तुडवावी लागते. हिमवर्षा देखील परिक्षा घेतच असते. वाट अवघड असल्याने जराही तोल गेला की, थेट मृत्यूशी गळाभेट होण्याची भीती असते.

अन् आम्ही मृत्यूच्या जबड्यात...
वरवर जाताना श्वास घेणे अवघड होत होते. मध्येच धो धो कोसळणारा पाऊस, वादळवारा होता. आमच्यातील तीन ते चार गिर्यारोहक श्वासाच्या त्रासामुळे खाली कोसळले. गलितगात्र तिघांना उचलून आम्ही अखेरीस सारपास ट्रेक पूर्ण केलाच. आम्ही सर्वांनीच तो रोमांचकारी क्षण एकमेकांची गळाभेट घेऊन साजरा केला.
- दिनेश देशमुख, नीलेश शर्मा, दीपेश जैन, गिर्यारोहक, चाळीसगाव.

Web Title: 'Sarpas' peak in the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.