सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:06+5:302021-08-20T04:22:06+5:30
केंद्र शासनाने सरपंचांना गाव विकासाचे पूर्ण अधिकार दिले असून, कुटुंबप्रमुख या नात्याने सरपंचाने कामगिरी करायला हवी, मूलभूत गरजा स्वच्छ ...

सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास साधावा
केंद्र शासनाने सरपंचांना गाव विकासाचे पूर्ण अधिकार दिले असून, कुटुंबप्रमुख या नात्याने सरपंचाने कामगिरी करायला हवी, मूलभूत गरजा स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा,घरोघरी वापरात येईल, असे शौचालय व गाव स्वच्छता हे केल्यास गावचे आरोग्य चांगले राहील, शिक्षणासाठी उत्कृष्ट शाळा, वृद्ध नागरिकांचा सन्मान याकडे लक्ष दिल्यास गावचा विकास आपोआप होतो .गावातील नागरिकांना चर्चा करून ग्रामपंचायतीने धोरण ठरवायला हवे.
यावेळी खा. उन्मेष पाटील, आ. किशोर पाटील, माजी आ. दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी अतुल पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे पाटील, पदमसिंग पाटील, पं. स. सदस्य अनिता पाटील, डॉ. एल. टी. पाटील, प्रकाश पाटील, नरेन्द्र पाटील, किशोर बारावकर, विकास पाटील, शेवाळे सरपंच योगेश पाटील, वाडी सरपंच रेखाबाई पाटील उपस्थित होते.