सप्तश्रृंगी गडावरून ज्योत आणत पहूर येथे होते घटस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:29 IST2018-10-09T18:27:05+5:302018-10-09T18:29:25+5:30
जय भवानी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी वणी येथील सप्तश्रृंगी गडावरून ज्योत घेवून पदयात्रेद्वारे दरवर्षी प्रमाणे पहूर मध्ये बुधवारी सकाळी येत आहे.

सप्तश्रृंगी गडावरून ज्योत आणत पहूर येथे होते घटस्थापना
ठळक मुद्देपहूर येथील भाविकांची पदयात्रापहूर येथील जय भवानी मंडळाची परंपरासप्तश्रृंगी गडावरुन ज्योत आणून करतात घटस्थापना
पहूर, ता.जामनेर : येथील जय भवानी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी वणी येथील सप्तश्रृंगी गडावरून ज्योत घेवून पदयात्रेद्वारे दरवर्षी प्रमाणे पहूर मध्ये बुधवारी सकाळी येत आहे.
घटस्थापनेच्या दिवशी सकाळी त्यांचे आगमन होणार आहे. या पदयात्रेत एकनाथ करवंदे, नरेंद्र्र बोदडे, ललित धनगर, संदीप धनगर, जगदीश सुरवंशी, गजानन चौधरी, महेश चौधरी, वैभव बोदडे, पंढरी धनगर, नागेश कन्हैया चौधरी, दीपक करवंदे, लल्ला सोनार , मुन्ना घोंगडे आदींचा समावेश आहे. दरवर्षी मंडळाचे भक्तगण गडावरून ज्योत आणून घटस्थापना करीत असतात . ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे .