रावेर येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 02:57 PM2020-12-09T14:57:14+5:302020-12-09T14:57:14+5:30

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती दिनानिमित्त विविध संस्था, शाळा महाविद्यालय येथे पूजन कार्यक्रम करण्यात आले.

Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrations at Raver | रावेर येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात

रावेर येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात

googlenewsNext
वेर : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती दिनानिमित्त रावेर येथील तेली समाजासह शासकीय कार्यालय, विविध संस्था, शाळा महाविद्यालय येथे मूर्ती व प्रतिमा पूजन कार्यक्रम करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.येथील तेली समाज पंच भुवनमध्ये जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष नारायण चौधरी यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक ॲड.सूरज चौधरी, हिरामण चौधरी, चंदू चौधरी, पंकज चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, किरण चौधरी, गणेश चौधरी, बाळकृष्ण बागुल, दिनेश चौधरी, अंबादास चौधरी, शांताराम चौधरी, सुभाष चौधरी, संतोष चौधरी, प्रकाश चौधरी, गोलू चौधरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचप्रमाणे तहसील कार्यालय, रावेर नगरपालिका, रावेर पंचायत समिती, रावेर पोलीस ठाणे, कारागीर व्यायाम शाळा, विविध संस्था, शाळा महाविद्यालय येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Web Title: Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrations at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.