आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २४- गुरुपूजा दिवसानिमित्त शनिवारी संत निरंकारी मंडळाच्या जळगाव शाखेच्यावतीने जिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये एक ट्रॅक्टर कचरा जमा करून रुग्णालय परिसर स्वच्छ करण्यात आला.सद्गुरु बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुपूजा दिवस साजरा करण्यात येतो. यामध्ये आज जगभरात ६०हून अधिक देशात शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जळगाव जिल्हा रुग्णालयातही ही मोहिम राबविण्यात आली.यामध्ये मंडळाचे संयोजक रमेशकुमार आहुजा, क्षेत्रीय संचालक सुशील दारा यांच्या मार्गदर्शनाखाली निंरकारी सेवा दलाच्या अनुयायी, भाविक मिळून दीडशेहून अधिक जणांनी रुग्णालयातील कोपºया-कोपºयात साफसफाई करून एक ट्रॅक्टर कचरा जमा केला. यासाठी मनपाने ट्रॅक्टर उपलब्ध करून सहकार्य केले.या स्वच्छता मोहिमेसाठी आमदार सुरेश भोळे यांनीही उपस्थित राहून स्वच्छतेत त्यांनीही हातभार लावला. संचालक गंगाधर जोशी, सुभाष सोनवणे, ज्ञान प्रचारक राजकुमार वाणी, अनिल जोशी आदींनी परिश्रम घेतले.
संत निरंकारी मंडळाने जळगाव जिल्हा रुगणालय परिसर केला स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:12 IST
एक ट्रॅक्टर कचºयाची विल्हेवाट
संत निरंकारी मंडळाने जळगाव जिल्हा रुगणालय परिसर केला स्वच्छ
ठळक मुद्देआमदार सुरेश भोळे यांनीही लावला स्वच्छतेस हातभारगुरुपूजा दिवस