भुसावळ येथे संत काशिबा गुरव महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:46 IST2018-12-24T17:44:47+5:302018-12-24T17:46:18+5:30

भुसावळ येथील गुरव समाजातर्फे संत शिरोमणी श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रविवारी पंचायती वाड्यात पार पडला.

Sant Kashiba Gurav Maharaj Jayanti celebrated at Bhusawal | भुसावळ येथे संत काशिबा गुरव महाराज जयंती साजरी

भुसावळ येथे संत काशिबा गुरव महाराज जयंती साजरी

ठळक मुद्देपंचायती वाड्यात विविध कार्यक्रममान्यवरांनी केले मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : येथील गुरव समाजातर्फे संत शिरोमणी श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रविवारी पंचायती वाड्यात पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, पारोळ्याचे उद्योगापती एम.सी.गुरव, गुरव समाज राष्ट्रीय महासंघ महिला अध्यक्षा सोनाली भामरे, अनिल जैन, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, जे.बी.कोटेचा उपस्थित होते.
या वेळी आरती व द्वीपप्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गुरव समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली.
या वेळी नीलिमा गुरव, वैशाली गुरव, बाळकृष्ण गुरव, संतोष चिनावलकर, भालचंद्र ओगले, मंगेश शिंदे, दत्तात्रय कासोदेकर, किरण उतराणकर, प्रवीण भंबाडकर, किशोर भादलीकर, शिरीष शिंदे, खुशाल कांबळे, रामचंद्र निंबाळकर, प्रशांत नेवासकर, पवन बेलगावळर, श्रीराम अडावदर, अनंत उत्राणकर, गजानन नेवेस्कर, रवींद्र गुरव, शरद कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन भिडे याने केले. कार्यक्रमासाठी भुसावळ व तालुक्यातील समाज बांधन उपस्थित होते. विनोद वाघे यांनी आभार मानले.

Web Title: Sant Kashiba Gurav Maharaj Jayanti celebrated at Bhusawal