मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतींना सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:01 IST2020-05-01T20:01:29+5:302020-05-01T20:01:59+5:30
मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत कार्यालयांना सॅनिटायझर पुरवण्यात आले. शुक्रवारी हे साहित्य पंचायत ...

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतींना सॅनिटायझर वाटप
मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत कार्यालयांना सॅनिटायझर पुरवण्यात आले.
शुक्रवारी हे साहित्य पंचायत समितीला प्राप्त झाले. सकाळी १० वा. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, पं.स. सभापती प्रल्हाद जगंले, उपसभापती विद्या पाटील, जि.प.सदस्य नीलेश पाटील, वैशाली तायडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, पं. स. सदस्य विकास पाटील, राजू सवळे, सुवर्णा साळुंखे, सुनील काटे, चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, दीपक साळुंखे यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना प्रातिनिधिक स्वरुपात सॅनिटायझरचे कॅन वाटप करण्यात आले.
तसेच कुऱ्हा वडोदा जि.प. गटाचे सॅनिटायझर शनिवारी सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, कुऱ्हा येथे वाटप करण्यात येणार आहे. गटातील सरपंच व ग्रामसेवक यांनी हजर राहावे, आवाहन उपसभापती विद्या पाटील यांनी केले आहे.