वाळू चोराने पथकाच्या अंगावर टेम्पो नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:38 IST2017-08-28T22:35:38+5:302017-08-28T22:38:04+5:30

तलाठी जखमी, वाहन चालक फरार

The sand thief took the tempo on the side of the squad | वाळू चोराने पथकाच्या अंगावर टेम्पो नेला

वाळू चोराने पथकाच्या अंगावर टेम्पो नेला

ठळक मुद्देबोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरूवाळू चोरांना पकडायला पथक गेले होतेदोघांनी टेम्पो पकडला,
नलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव , दि...२८ :वाळूचोरला पकडायला गेलेल्या पथकाच्या अंगावर टेम्पो नेला. यात तलाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पावणेसात वाजता खळेश्वर रस्त्यावर घडली.बोरी नदी पत्रातून ट्रॅक्टर आणि टेम्पोतून अवैध वाळू वाहतूक होत आहे. मंडळाधिकारी ए. के. देशमुख, तलाठी पराग पाटील (नांदगाव), तलाठी राजेंद्र दाभाडे (वावडे) यांचे पथक वाळू चोरांना पकडण्यासाठी २८ रोजी सायंकाळी पावणेसात वाजता खळेश्वर मंदिर रस्त्यावर गेले होते. महाजन नामक टेम्पो चालक वाळू वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या लक्षात येताच त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने टेम्पो पथकाच्या अंगावर चालवून आणला. त्यात तलाठी पराग पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. टेम्पो चालक पळून जात असताना दोघांनी पाठलाग करून टेम्पो ताब्यात घेतला. मात्र चालक पळून गेला. तलाठी पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पो पकडून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The sand thief took the tempo on the side of the squad