शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चारच गटातून मिळणार खासगी कामांसाठी वाळू! दोन तालुक्यातून होणार जिल्हाभर रेतीचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:25 IST

दरम्यान, या चार गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या डेपोंसाठी दि.१० मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. दि.११ रोजी या डेपोंचा ठेका निश्चीत केला जाणार आहे.

जळगाव : राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार रावेरच्या तीन आणि अमळनेरच्या एका गटातून खासगी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होणार आहे. अन्य चार वाळू गट मात्र शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या चार गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या डेपोंसाठी दि.१० मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. दि.११ रोजी या डेपोंचा ठेका निश्चीत केला जाणार आहे.

राज्य शासनाने नवे वाळू धोरण निश्चीत केले आहे. त्यानुसार आता ६०० रुपयात ब्रासभर रेती मिळणार आहे. त्यामुळे खासगी बांधकामांचा खर्च कमी होणार आहे. या धोरणानुसार नगर जिल्ह्यात वाळू विक्रीला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात पर्यावरण समितीने ८ गटांना मंजुरी दिली आहे. त्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळे, पातोंडी, दोधी तर अमळनेर तालुक्यातील धावडे गटातल्या वाळूची उचल खासगी बांधकामांसाठी करण्यात येणार आहे. अन्य चार गटातील वाळू शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

डेपोंसाठी निविदाउचल केलेल्या वाळू विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी डेपो उभारण्यात येणार आहेत. ही सारी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणालीची सक्तीही असणार आहे.डेपोचा ठेका वाटपासाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. दि.१० मेपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून दि.११ रोजी या निविदा काढण्यात येणार आहे. 

तर कशी परवडणार वाळू?जिल्ह्यात रावेर आणि अमळनेर तालुक्यातील गटातील वाळू खासगी कामांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, चोपडा तालुक्यातील जनतेला या वाळू वाहतुकीपोटी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे ६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळूपेक्षा प्रवासाचा खर्च दुपटीने होणार आहे. साहजिकच त्याचा भार जनतेवर पडणार आहे. त्यामुळे ही वाळू ग्राहकांना परवडणार कशी, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव