वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर झाडावर धडकून चालक ठार

By Admin | Updated: May 20, 2017 17:02 IST2017-05-20T17:02:19+5:302017-05-20T17:02:19+5:30

आसनखेडा जंगल रस्त्याने लोहारा येथे वाळूची खेप टाकून परतताना लोहारा जंगलात ट्रॅक्टर झाडावर धडकले.

A sand carrying tractor hit a tree and killed the driver | वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर झाडावर धडकून चालक ठार

वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर झाडावर धडकून चालक ठार

ऑनलाइन लोकमत

खडकदेवळा, जि. जळगाव, दि. 20 - वाळूची अवैध वाहतूक करताना ट्रॅकर झाडावर धडकल्याने ट्रॅक्टरचालक अमोल नाना पाटील (20, रा. कुरंगी) हा तरुण ठार झाला. 
कुरंगी येथील गिरणा नदीच्या पात्रातून 19 रोजी मध्यरात्री  आसनखेडा जंगल रस्त्याने लोहारा येथे  वाळूची खेप टाकून परतताना लोहारा जंगलात  ट्रॅक्टर झाडावर धडकले. यात चालक अमोल पाटील  हा गंभीर जखमी झाला. तशाच स्थितीत  त्याने मालकाला माहिती दिली. त्या वेळी मालक व इतर वाहतूकदारांनी जाऊन अमोल यास मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये आणून कुरंगी येथील त्याच्या  जुन्याघरी झोपवून दिले. सकाळी मात्र तो उठला नाही त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना खबर दिली व नांद्रा येथे डॉक्टरांकडे हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून  या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: A sand carrying tractor hit a tree and killed the driver