संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २०० प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:05+5:302021-07-02T04:13:05+5:30
संजय गांधी निराधार योजनेची बैठक गेल्या अनेक महिन्यांपासून झाली नसल्याने अनेक प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थींचे लक्ष या बैठकीकडे लागून ...

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २०० प्रकरणांना मंजुरी
संजय गांधी निराधार योजनेची बैठक गेल्या अनेक महिन्यांपासून झाली नसल्याने अनेक प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थींचे लक्ष या बैठकीकडे लागून होते. या बैठकीला तहसीलदार अनिल गवांदे, समिती सदस्य चतुर भाऊसाहेब पाटील (दळवेल), डाॅ. दिनकर पाटील (शेवगे प्र.ब.), सुभाष पाटील (पळासखेडे), कैलास पाटील (शिरसमणी), लक्ष्मीकांत निकम (उंदीरखेडे), गायत्री महाजन (पारोळा), कल्पना पाटील (पारोळा), लालजी भिल (मंगरूळ), ज्ञानेश्वर पाटील (वेल्हाणे), नायब तहसीलदार आर. बी. शिंदे उपस्थित होते.
कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत खालील लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले. चंद्रकला मधुकर पाटील (टोळी), सरला शरद मोरे (लोणी), अल्काबाई इच्छाराम पाटील (पारोळा), यशोदा विजय सोनवणे (म्हसवे), रेखाबाई देवाजी भोई (पारोळा), अनिता राजेंद्र महाजन (पारोळा), प्रतिभा अशोक पाटील (वेल्हाणे खु.) यांना वाटप करण्यात आले.
010721\01jal_7_01072021_12.jpg
पारोळा येथे कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करताना आमदार चिमणराव पाटील