यावल येथे दुकानाचे शटर्स उचकवून ३७ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:43 IST2019-01-02T13:43:14+5:302019-01-02T13:43:47+5:30
इतरही दोन-तीन दुकानात चोरीचा प्रयत्न

यावल येथे दुकानाचे शटर्स उचकवून ३७ हजार लंपास
ठळक मुद्देश्वान पथकास पाचारण
य वल: शहरातील मुख्य रस्त्यावररील दोन - तीन दुकांनाचे शेडचे शटर्स उचकवून अज्ञात चोरटयांनी ३७ हजार तीनशे रुपयांच्या रोकडसह सी. सी.कॅमेराच्या दोन दुकानातील डी. व्ही. आर मशीन्स लंपास केल्या आहेतचोरट्यांंनी आधुणिक पध्दतीने शटर्स उचकावून कुलूपे हायड्रोलीक सीस्टीमने कट करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलीसांनी डॉग स्कॉट व ठसे तज्ञास पाचारण केले असून दुपार पर्यंंंत पथक शहरात पोहचेल.चोरटयांनी शहरातील सर्व प्रसिद्ध दुकानेच फोडण्याचा प्रयत्न केला आहे.येथील अत्यंत गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अशोका कापड दुकानांचे शटर कुलूपासह उचकवून दुकानातील ३७ हजार तीनशे रुपयाच्या रोकडसह, सी सी कॅमेरा चे डीव्हीआर मशीन लंपास केले आहे.त्याचप्रमाणे समर्थ ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून तेथील डीव्हीआर मशीन लंपास केली आहे. तर येथील दगडूशेट सोनार यांच्या दुकानाचे दोन मुख्य कुलूपांसह सेंटर लॉकसह शटरच सुमारे दोन फुट उचकवले मात्र दुकानाचे पारंपारिक पद्धतीच्या अत्यंत मजबुत असलेल्या सागवान लाकडी पट्टया अडकवण्याच्या पध्दतीमुळे चोरट्यांना आत शिरता न आल्याने दुकानातील लाखो रुपयाचा सोन्या-चांदिचा ऐवज वाचला आहे. तसेच महाजन मेडिकल व बाजीराव काशिदास कवडीयाले यांचे सोन्या चांदिचे दुकानोच कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला आहे.