संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:48 IST2019-05-19T12:48:34+5:302019-05-19T12:48:57+5:30

सोमवारी सांगता

Saint Sakharam Maharaj organized a pilgrim | संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी मिरवणूक

संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी मिरवणूक

अमळनेर, जि. जळगाव : संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त रविवारी सकाळी अमळनेर येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या मध्ये हजारो भाविक सहभागी झाले. २० रोजी काल्याच्या कीर्तनाने या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
खान्देशचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या अमळनेरातील यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी माहेरवाशीनी आणि बाहेर नोकरीला गेलेले आपापल्या गावी येत असतात. त्यामुळे कौटुंबीक जिव्हाळा प्रेम वृद्धिंगत होते. गेल्या २५० वर्षांपासून अखंडपणे साजºया होणाºया या यात्रोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. या यात्रोत्सवानिमित्त रविवारी पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Saint Sakharam Maharaj organized a pilgrim

टॅग्स :Jalgaonजळगाव