मेहुण येथे संत मुक्तार्इंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:10 AM2019-05-22T01:10:03+5:302019-05-22T01:10:16+5:30

श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा ७२३ वा गुप्त दिन सोहळा मेहुण, ता.मुक्ताईनगर येथे १९ मेपासून सुरू झाला.

Saint Muktawari's Secret Day celebrations at Mehun | मेहुण येथे संत मुक्तार्इंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ

मेहुण येथे संत मुक्तार्इंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ

Next

मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा ७२३ वा गुप्त दिन सोहळा मेहुण, ता.मुक्ताईनगर येथे १९ मेपासून सुरू झाला. हा सोहळा येत्या ३१ मेपर्यंत चालणार आहे.
या कालावधीत तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थानात दरवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संत मुक्ताई गुप्त होण्याला सव्वासाठ तपे पूर्ण झाली आहेत.
तसेच मुक्ताई मंदिर मेहुणच्या स्थापनेचे व वै.ह.भ.प. गुरूवर्य बंकटस्वामी महाराज यांच्या समाधीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येणार आहे. वाचक ह़भ़प़ सुरेश महाराज तळवेलकर व ह़भ़पक़डू महाराज जंगले वराडसीम आहेत.
वैशाख वद्य प्रतिपदा दि. १९ रोजी सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलन, कलशपूजन, अभिषेकाने सोहळ्यास प्रारंभ झाला.
दररोज पहाटे काकडा, ७ वाजता श्री मुक्ताई स्तोत्र व श्रीविष्णू सहस्त्र नामस्तोत्र, सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ भजन, सायंकाळी हरीपाठ व रात्री हरीकीर्तनाचा कार्यक्रम होत आहे.
विशेष कार्यक्रमात वैशाख वद्य दशमी दि. २९ रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान संत मुक्ताई गुप्त सोहळ्याचे कीर्तन सुधाकर महाराज मेहुणकर यांचे होईल. तसेच दि. ३० रोजी संत मुक्ताई मासिक वारी हरीकीर्तन महादेव महाराज बीड यांचे होणार आहे.
१९ रोजी समाधान महाराज रेंभोटा, २० रोजी सुरेश महाराज तळवेल, २१ रोजी ज्ञानेश्वर महाराज मेहुण, २२ रोजी ज्ञानेश्वर महाराज शेलवड, २३ रोजी बबन महाराज जांभुळधाबा, २४ रोजी लक्ष्मण महाराज भुसावळ, २५ रोजी कौतिक महाराज भानखेडा, २६ रोजी किशोर महाराज तळवेल, २७ रोजी शिवदास महाराज पान्हेरा, २८ रोजी ऋषिकेश महाराज श्रीरामपूर, २९ रोजी महादेव महाराज राऊत बीड, ३० रोजी महान तपस्वी मौनीबाबा परभणीकर यांची कीर्तने होणार आहेत.
दि. ३१ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान शारंगधर महाराज मेहुणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दि. ४ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी पालखी प्रस्थान होणार आहे.
भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक तथा अध्यक्ष रामराव महाराज मेहूणकर व माजी अध्यक्ष बाबूराव महाराज मेहुणकर यांनी केले आहे.

Web Title: Saint Muktawari's Secret Day celebrations at Mehun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.