रियान परागने बॅटवर घेतली विराटची स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST2021-04-24T04:16:46+5:302021-04-24T04:16:46+5:30

आयपीएल २०२१ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला. देवदत्त पड्डीकलचे शानदार शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक यांच्या ...

Ryan Parag took Virat's signature on the bat | रियान परागने बॅटवर घेतली विराटची स्वाक्षरी

रियान परागने बॅटवर घेतली विराटची स्वाक्षरी

आयपीएल २०२१ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला. देवदत्त पड्डीकलचे शानदार शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक यांच्या जोरावर आरसीबीने आपला सलग चौथा विजय मिळवला. मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग याची फॅन बॉय मोमेंट सर्वांना बघायला मिळाली. रियान पराग याने सामना संपल्यावर आपल्या बॅटवर भारतीय संघाचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याची स्वाक्षरी घेतली.

या सामन्यात राजस्थानच्या संघाला १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला असला तरी त्यानंतर रियानच्या कृतीने त्याने सर्वांची मने जिंकली. अष्टपैलू खेळाडू रियानने कोहलीला त्याच्या बॅटवर स्वाक्षरी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर विराटने त्याच्या बॅटवर स्वाक्षरी दिली. रियान याने नुकतेच म्हटले होते की, ‘त्याला कोहलीसोबत बिहु डान्स करायचा आहे.’

या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानने १७७ धावा केल्या मात्र सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल यांनी एकही विकेट न गमावता संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Ryan Parag took Virat's signature on the bat