अमळनेर मतदारसंघात ग्रामीण रस्ते बनले आता प्रमुख जिल्हा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST2021-08-19T04:20:39+5:302021-08-19T04:20:39+5:30
अमळनेर : मतदार संघातील रहदारीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्याचा शासन ...

अमळनेर मतदारसंघात ग्रामीण रस्ते बनले आता प्रमुख जिल्हा मार्ग
अमळनेर : मतदार संघातील रहदारीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्याचा शासन आदेश प्राप्त झाला आहे. आमदार अनिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. यामुळे ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारून दळणवळण गतिमान होण्यास मदत होणार आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेचा ठरावदेखील बांधकाम विभागाला प्राप्त झाला होता. याद्वारे मतदारसंघातील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेला शासन आदेश प्राप्त झाला. रस्त्यावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर याद्वारे मतदारसंघातील काही रस्ते दर्ज्जोन्नत करण्याचा शासन निर्णय पारित झाला आहे.
यामध्ये मांडळ, जवखेडा, अनोरा, आर्डी, पिंपळे खु., पिंपळे बु., मंगरूळ, शिरूड,कावपिंप्री ते प्रजिमा ४९ (आंबपिंप्री फाटा)ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२९ म्हणून नव्याने मान्यता मिळाली आहे.
तसेच हेडावे, रडावन, चिखलोद खु.,शेळावे खु., शेळावे बु., धाबे उन्नत, हिरापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १३० म्हणून नव्याने मान्यता मिळाली आहे. रस्ते विकास योजना २००१-२१ मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत ५०.५०० किलोमीटरने वाढ झाली आहे. अमळनेर मतदार संघातील हे रस्ते आता जिल्हा मार्ग म्हणून ओळखले जाणार असल्याने आता हे रस्ते दर्जेदार होणार आहेत.
मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाचे स्वागत केले असून याकामी सहकार्य करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्ता भरणे, पालकमंत्री गुलाबराव पाटील या सर्वांचे आभार मानले आहेत.