गाळे लिलाव प्रक्रिया नियमानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:18 IST2021-09-19T04:18:41+5:302021-09-19T04:18:41+5:30

पाचोरा : पाचोरा नगर परिषदेने उभारलेल्या तीन मजली व्यापारी संकुलाच्या लिलावातील अटी व शर्तीला आक्षेप घेत दाखल करण्यात ...

As per the rules of the auction process | गाळे लिलाव प्रक्रिया नियमानुसारच

गाळे लिलाव प्रक्रिया नियमानुसारच

पाचोरा : पाचोरा नगर परिषदेने उभारलेल्या तीन मजली व्यापारी संकुलाच्या लिलावातील अटी व शर्तीला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. तसेच पालिकेने राबवलेली लिलाव प्रक्रिया नियमानुसारच असल्याचा निकाल दिला आहे.

पाचोरा पालिकेने तीन मजली नवीन कै. के.एम. (बापू) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. यातील अटी-शर्तीबाबत चंद्रकांत मुरलीधर येवले व पितांबर गोविंदा पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर हा निकाल देण्यात आला आहे.

दरम्यान, या निकालामुळे व्यापारी बांधवांना आता पैसे भरण्यासाठी अल्प मुदत मिळाली असून त्यांनी बोली रक्कम वेळेत न भरल्यास अनामत रक्कम जप्त करून सदर गाळ्यांचा पुनर्लिलाव करण्यात येईल, असे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी म्हटले आहे. पाचोरा येथे उभारलेल्या के.एम. (बापू) पाटील व्यापारी संकुलात तळमजल्यावर फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी १४२ ओटे, पहिल्या मजल्यावर ५८ तर दुसऱ्या मजल्यावर १०१ गाळे यांचा लिलाव केला होता.

Web Title: As per the rules of the auction process