‘हतनूर’चे सर्व दरवाजे उघडल्याने ‘तापी’चा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:10+5:302021-07-24T04:12:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहराजवळील तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला ...

Rudravatar of 'Tapi' as all the doors of 'Hatnur' were opened | ‘हतनूर’चे सर्व दरवाजे उघडल्याने ‘तापी’चा रुद्रावतार

‘हतनूर’चे सर्व दरवाजे उघडल्याने ‘तापी’चा रुद्रावतार

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : शहराजवळील तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी दुभडी भरून वाहत असून, हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने रात्री दहाला हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण फुल भरले असल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

३८ हजार हेक्‍टरला लाभ

धरणाची जलपातळी २०९.२१० मीटरपर्यंत पोहोचलेली असून, १७३.३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४४. ६६ टक्के इतका जलसाठा आहे. या पाण्याचा भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर या पाच तालुक्‍यांतील ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीला लाभ मिळणार आहे.

Web Title: Rudravatar of 'Tapi' as all the doors of 'Hatnur' were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.