कोरोनाबाबत आरपीएफकडून जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 21:21 IST2020-03-21T21:20:49+5:302020-03-21T21:21:17+5:30
रेल्वे प्रशासन । कर्मचाऱ्यांना मात्र कोणतीही सुरक्षा नाही

कोरोनाबाबत आरपीएफकडून जागृती
भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरस विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आर.पी.एफ कडुन उद्घोषणा यंत्राद्वारे आवाहन केले जात आहे. मात्र आपले कर्तव्य बजावत असणाºया आर.पी.एफ कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून मास्क तसेच कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नसल्याचे दिसून आले आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवांशाची ये -जा सुरू असते . त्यामुळे प्रवाशांनी स्वत : खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावावे असे आवाहन रेल्वे स्टेशन वर आर.पी.एफ कर्मच्यांºयांकडून केले जात आहे . मात्र लोकांमध्ये जनजागृती करण्याºयांनाच रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा दिली नसल्याचे दिसून येत आहे.