पाच एकर केळीवर फिरवले रोटाव्हीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:50 IST2019-06-07T17:50:50+5:302019-06-07T17:50:56+5:30

वादळी पावसाचा दुष्परिणाम : मितावली येथील शेतकऱ्याचे लाखो रुपये पाण्यात

Rotaviter rotated on five acres of banana | पाच एकर केळीवर फिरवले रोटाव्हीटर

पाच एकर केळीवर फिरवले रोटाव्हीटर


बिडगाव, ता.चोपडा : लाखो रुपए खर्च करीत सहा महिने ऐन दुष्काळात लहान मुलाप्रमाणे वाढवलेल्या केळीच्या पिकाची मेहनत फळाला येत असतांनाच अस्माणी संकट कोसळुन ऐन पावसाळ्याच्या तोंडावर २ जुन रोजी आलेल्या गारपीट व वादळाने बहरलेल्या या केळीला नेस्तनाबुत करुन तोंडी आलेला घास हिरावला गेला. यामुळे केळी पिकाची नैसर्गिक प्रक्रीयाच थांबुन ते खराब होऊ लागल्याने मितावली येथील कैलास परबत पाटील यांना पाच एकरावरील ट्युशूच्या केळीवर रोटाव्हीटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली.
अशा प्रकारे नुकसानीत धानोरा परिसराचा मोठा समावेश होता. दिड वर्षात धानोरा शिवारातील गावांना तब्बल तीन वेळा गारपिट व वादळाचा तडाखा बसला असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. तर आता झालेले वादळ आणि गारांचा जोरदार फटका यामुळे े पिकांच्या मुळा तुटून पडलेल्याने नैर्सगीक प्रकिया थांबुन वाढ थांबली व ते निस्तेज होऊ लागल्याने ते काढुन फेकण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
दरम्यान वादळी पावसाने झालेल्या नुकसानीनंतर अनेक शेतकरीच्या दोन-तीन दिवस चुलीही पेटल्या नव्हत्या.

Web Title: Rotaviter rotated on five acres of banana