रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा पदग्रहण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:26+5:302021-07-22T04:12:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- रोटरी परिवारात यंदा रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा समावेश झाला असून, या क्लबचा पदग्रहण सोहळा राजीव ...

Rotary Club Jalgaon Elite's inauguration ceremony in excitement | रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा पदग्रहण सोहळा उत्साहात

रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा पदग्रहण सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- रोटरी परिवारात यंदा रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा समावेश झाला असून, या क्लबचा पदग्रहण सोहळा राजीव शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी दुपारी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये उत्साहात झाला. शर्मा यांच्या हस्ते चार्टर प्रेसिडेंट पदाचे नितीन इंगळे, तर मानद सचिव पदाचे सूत्र संदीप असोदेकर यांनी स्वीकारले.

नितीन इंगळे यांनी आगामी वर्षातील नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. सातपुडा पर्वतानजीकच्या किनगाव परिसरातील आदिवासी वस्त्या, पाडे, तसेच जामनेर तालुक्यातील खडकी परिसरातील तांड्यांवरील गरजूंसाठी भव्य आरोग्य शिबिर घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विष्णू भंगाळे यांनी रमेश मेहर यांच्या संदेशाचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ.वैजयंती पाध्ये यांनी केले. आभार डॉ.पंकज शहा यांनी मानले. कार्यक्रमात नंदू परदेशी, विनायकराव असोदेकर, प्रभावती असोदेकर, काजल असोदेकर, चारू इंगळे, डॉ.गोविंद मंत्री, संगीत पाटील, डॉ.चंद्रशेखर सिकची आदी उपस्थित होते.

Web Title: Rotary Club Jalgaon Elite's inauguration ceremony in excitement