कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:13 PM2022-09-17T16:13:31+5:302022-09-17T16:14:43+5:30

राज पुन्शी हे सकाळी औरंगाबादकडे जात असतांना घाट संपण्याच्या ठिकाणी झालेला हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कामगारांना बोलावून दगड हटविला.

Rock fell in Kannada Ghat; The protective sheet was also broken; A few stones directly into the valley | कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत

कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत

Next

जिजाबराव वाघ -

चाळीसगाव
- गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कन्नड घाटात भूस्सखलन होऊन काही मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. या घटनेत रस्त्याच्या कडेला असणारा संरक्षक पत्राही तुटला आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे घडला असावा, असा अंदाज आहे. 

राज पुन्शी हे सकाळी औरंगाबादकडे जात असतांना घाट संपण्याच्या ठिकाणी झालेला हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कामगारांना बोलावून दगड हटविला. पावसाचा जोर पाहता अजून भूस्सखलन होण्याची शक्यता असून वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी. असे सांगण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी कन्नड घाटात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने काही ठिकाणी भूस्सखलन झाले होते. रस्त्याही चार ते पाच ठिकाणी खचला होता. यामुळे महिनाभर घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद केला गेला होता.
 

Web Title: Rock fell in Kannada Ghat; The protective sheet was also broken; A few stones directly into the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.