शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:29 IST

आरोपीने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती.

जळगाव : चुकीच्या प्रवृत्तींचा राजकीय क्षेत्रात झालेल्या शिरकावाबद्दल अनेकदा चर्चा होत असते.  अशातच आता चक्क एका अट्टल घरफोड्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवाराबद्दल ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रवीण सुभाष पाटील असं सदर आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यात गेल्या काही दिवसांत अनेक घरफोड्या झाल्या होत्या. या गुन्ह्यांमध्ये बिलवडी येथून ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा उमेदवार असलेला प्रवीण पाटील याचा सहभाग असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाटील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने २० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.  

घरफोड्यातून आलेले पैसे निवडणुकीत उधळले!

प्रवीण पाटील याने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती. या चोऱ्यांतून आलेला पैसा त्याने बिलवडी ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च केला. मात्र सरपंचपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या प्रवीण पाटीलला गावकऱ्यांनी नाकारत त्याचा पराभव केला.

दरम्यान, आरोपी प्रवीण पाटीलकडून पोलिसांनी १७३ ग्रॅम सोने, एक स्विफ्ट डिझायर कार आणि एक दुचाकी असा एकूण २० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस